Breaking News

केंद्र सरकारचे सामाजिक समतेच्या विचाराकडे दुर्लक्ष असल्याचे केतकरांचे मत

नांदेड, दि. 28 - सध्याचे केंद्र सरकार सामाजिक समतेच्या विचाराकडे दुर्लक्ष करून पाहत आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी नांदेड येथे केले.  अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त लोेेक तुरूंगात आहेत. त्या ठिकाणी अन्यायाची वागणुक दिली जात आहे. अशीही टीका यांनी मोदी ट्रम्प भेटीच्या पार्श्भूमीवर ट्रम्प  सरकारवर केली.
प्रगतीशील लेखक संघ, दै. उद्याचा मराठवाडा आणि मौर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 5 वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन कै. शंकरराव चव्हाण सभागृह  येथे आयोजित केले होते. या संमेलनात बीज भाषण करताना कुमार केतकर म्हणाले की, सध्याचे सरकार सामाजिक समतेच्या विचाराकडे दुर्लक्ष करून पाहत आहे.  2019मध्ये ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी त्या निवडणुकीत मोदी सरकारचा पराजय होईल, पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान होणे येणार्या निवडणुकीमध्ये  शक्य नाही. आयोध्याचा राम जरी आला तरीही पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत. सध्याचे सरकार हे अमित शहा, उरजित पटेल, अरूण जेटली आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौघेजणच पाहत आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये आणि त्यांच्यात नेतेमंडळीमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनोल्ट ड्रम्प यांची भेट घेतली ती बाब चांगली आहे. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त लोेेक तुरूंगात आहेत. त्याठिकाणी अन्यायाची वागणुक दिली  जात आहे. ओबोमा यांनी त्या बाबीला छेद दिला होता परंतु सध्याची स्थिती त्या ठिकाणची वाईट आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर  यांनी आपले विचार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे व्यक्त केले. प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर सौ. शैलजा स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्याख्याते  पद्मश्री कुमार केतकर, प्रा.डॉ. प्रज्ञा दया पवार, साम टी.व्ही.चे संजय आवटे, व्याख्याते कॉ. भालचंद्र कांगो, प्रा. डॉ. बजरंग तिवारी (नवी दिल्ली), सकाळचे उत्तम  कांबळे या प्रमुख वक्त्यांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.