Breaking News

निगडी येथे रोपे आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ;आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी, दि. 28 - एकूणच जागतिक तापमानात सतत होणारी वाढ लक्षात घेता यासाठी आतापासूनच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सामाजिक  बांधिलकी जोपासत प्राधिकरण येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रोपवाटीका विभाग या समूहाने पुढाकार घेत रोपे आपल्या दारी हा उपक्रम कौतुकास्पद  असल्याचे उदगार भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. प्राधिकरण येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या  रोपवाटिका येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते रोपे आपल्या दारी या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी जगताप बोलत होते. 
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे,  सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक तुषार हिंगे, पुणे जिल्हाचे उपवनसंरक्षक रंगानाथ नाईकडे, रमाकांत कुलकर्णी, प्राधिकरण येथील जेष्ठ नागरिक संघाचे  पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले कि, पर्यावरणातील या बदलांमुळेच भविष्यात देशातल्या काही भागांत पूरसदृश परिस्थिती आणि काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती  निर्माण होईल, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. सध्या जलवायू परिवर्तनाचे संकट आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने तापमानात वाढ  होत आहे व याचे भयानक परिणाम दिसू लागले असल्याचे जगताप यांनी सांगितले.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले कि, आयुष्यात वृक्ष किती महत्त्वाचे आहेत म्हणून झाडे जितकी जास्त असतील तितक्या प्रमाणात श्‍वसनाशी संबंधित रुग्णांची  संख्या घटेल, या योजनेअंतर्गत वनविभागाच्या वनक्षेत्राच्या हद्दीतील नागरिकांना एका फोनवर रोपे घरपोच मिळणार आहेत. या रोपाची किंमत अल्प प्रमाणात ठेवण्यात  आली आहे. काठसादर, चिंच, आवळा, सीताफळ, जांभुळ, कवट, बेहडा, खैर, काशिद, शिरस, ऑस्ट्रेलियन बाभूळ, करंजी, चारोळी यांचे रोपेही मिळणार आहेत.  गुलमोहर, अंमलनरु, रेन्ट्री सात रुपये प्रमाणे तर शिवण, बांबू, सागवान यांची रोपे मिळणार आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेला यशस्वी करण्यासाठी हातभार  लावावा व पर्यावरणाचे रक्षण करावे असे प्रतिपादन पवार यांनी व्यक्त केले.