किनवट तालुक्यातील बत्तीस गावांत वीस दिवसापासून अंधाराचे साम्राज्य
नांदेड, दि. 01 - किनवट तालुक्यातील जवळपास 32 गावांल गेल्या 20 दिवसापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच किनवट शहरात विजेचा लपंडाव सुरूच असून, नियमीत वीज पुरवठयासाठी 5 एम.व्ही.ए. क्षमतेची दोन रोहित्र बसविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
वीस दिवसापूर्वी जुने टी.व्ही. केंद्र भागातील 33 के.व्ही. उप केंद्रातील 5 एम.व्ही.ए. क्षमतेचे रोहित्रात बिघाड झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री वीज पडल्याने 132 के.व्ही. केंद्रातील 5 एम.व्ही.ए.क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले. दि. 27 मे रोजी नांदेड शहरातील जंगमवाडी उप केंद्रातील रोहित्र नादुरूस्त झाले. त्यामुळे किनवटला आलेले 5 एम.व्ही.ए. क्षमतेचे रोहित्र नांदेडला नेऊन बसविण्यात आल्याने तालुक्यातील 32 गावामध्ये अंधार पसरला आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अधिकचा भार पडत असल्याने आणि मान्सूनपूर्व पावसाने व वादळी वार्याने सध्या सुरू असलेले 5 एम.व्ही.ए. क्षमतेचे रोहित्र कोणत्याही क्षणी नादुरुस्त होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. संभाव्य धोका ओळखून किनवट या नक्षलग्रस्त तालुक्यातील एम.व्ही.ए. क्षमतेची दोन रोहित्र वरून त्वरित पुरवठा करण्यात यावा. अन्यथा ट्रस्ट झालेली जनता कोणत्याही वेळी रस्त्यावर उतरण्याच्या तयारी आहे.