Breaking News

ऑस्ट्रेलियन ओपन : सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सिडनी, दि. 23 - ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या सायना नेहवालने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायनाने  मलेशियाच्या सोनिया चिया हिच्यावर 21-15, 20-22, 21-14 असा विजय मिळवला. दिवसाच्या सुरूवातीलाच सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारल्यामुळे  सायनालाही या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. त्यानुसार सायनाने सामन्याची सुरूवात विजयी गेमने केली. मात्र पुढच्याच गेममध्ये तिला पराभव पत्करावा  लागला. त्यामुळे दोघींमध्ये 1-1 गेमची बरोबरी होती. तिसरा गेमही अटीतटीचा होईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण सायनाने सफाईदार खेळ करत सामना  खिशात घातला.
दरम्यान, महिला दुहेरीत मात्र भारताच्या अश्‍विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या शीहो तानाका आणि कोहारु  योनेमोटो या जोडीने त्यांच्यावर 21-18, 18-21, 13-21 असा विजय मिळवला. या पराभवाबरोबरच पोनप्पा-रेड्डी जोडीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.