ऑस्ट्रेलियन ओपन : उपांत्यपूर्व फेरीत प्रणीत-श्रीकांत आमनेसामने
सिडनी, दि. 23 - ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरूष एकेरीमध्ये भारताच्या बी साई प्रणित आणि किदम्बी श्रीकांत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र उपांत्यपूर्व हे दोघेच आता एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
श्रीकांतने जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानी असलेल्या द. कोरियाच्या वान को याला 15-21, 21-13, 21-13 अशी मात दिली. श्रीकांतला पहिला गेम गमवावा लागला. मात्र, पुढील दोन्ही गेम समान फरकाने जिंकून श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर, दुसरीकडे प्रणीतने चीनच्या हुयांग युशियांग याला 21-15, 18-21, 21-13 असे नमवले. त्यामुळे आता भारताचे दोन बॅडमिंटनपटू उपांत्य फेरीत एकमेकांशी झुंजणार आहेत.