Breaking News

ऑस्ट्रेलियन ओपन : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिडनी, दि. 23 - ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीमध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधूने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.  सिंधूने चीनच्या चेन शियाओशिन हिला 21-13, 21-18 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. 46 मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूने सुरूवातीपासूनच सामन्यावर  पकड मिळवली होती. त्याच्याच जोरावर सिंधूने पहिला गेम मोठ्या फरकाने जिंकला. दुस-या गेममध्ये मात्र शियाओशिनने चांगली झुंज दिली. पण तिचे प्रयत्न तोकडे  पडले आणि सिंधूने उपांत्यपूर्व फेरी गाठली.