Breaking News

सौताडा येथे बस - दुचाकी अपघात एक ठार दोन जखमी

अहमदनगर, दि. 05 - सौताडा गावा जवळ बस आणि  दुचाकी  मधील अपघातात दुचाकीस्वार ठार झाला तर याच अपघातात दोन जण जखमी झाले  आहेत घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी  आणि पत्रकार संजय सानप  यांनी  घटनास्थळी जाऊन जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन जखमीवंर उपचार सुरु आहेत.
हकीगत अशी की पुणे -बीड एसटी क्रमांक  चक20इङ 2821 पुण्याहून बीड कडे जात असताना सौताडा गावाजवळील  पेट्रोल पंपाजवळ कुंसळब येथील दुचाकीस्वार  सतिश रामभाऊ घुमरे वय 25 व गुलाब पवार हे आले असता एसटी व मोटर सायकल यांची समोरासमोर घासाघासी झाली यावेळी बसचे कंट्रोल सुटले व गाडी रस्ता सोडुन खडयात गेली  या वेळी डोकयाला मार लागल्याने सतिश घुमरे हा जागीच ठार झाला  ठार झाला तर मागे बसलेला गुलाब पवार हा गंभीर जखमी झाला तर एस टी  मधील ज्ञानेश्‍वर संतोष भोसले वय 13 मु पो दहिवाडी जी उस्मानाबाद   हा जखमी झाला यास  जामखेड च्या  108 मध्ये घेऊन आले त्यावर  प्रथमोपचार करून त्या जखमीस पाटोदा  पोलीस ठाण्यात घेऊन गेले  
प्रत्यक्ष दर्शनी अभिजित मोरे मु पो पिपंळवंडी   या युवकाने अपघात स्थळावरून जाणारी महाराष्ट्र शासनाची   चक 45 ऊ 0012 ह्या गाडीच्या ड्रायव्हरला विनंती केली परंतु त्यांनी मदत केली नाही तरी. शासनाने या गाडी चा तपास लावून त्यावर योग्य कारवाही करावी अशी मागणी होत आहे
या वेळी ज्ञानेश्‍वर संतोष भोसले हा अपंग असल्याने त्याचा अंगावर निट कपडे सुद्धा नव्हते त्यास जैन श्रावक संघाचे  अध्यक्ष कांतीलाल कोठारी यांनी कपडे दिले  तर त्यास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी पत्रकार संजय सानप अभिजित मोरे ,विकास वनवे  ,अमोल ताथेड  संजय सानप  गणेश भळगट    डॉ युवराज  खराडे आदींनी मदत केली.