रेल्वे डब्यात गैरकृत्य करणार्यावर कारवाई करावी - मागणी
अहमदनगर, दि. 05 - दीगड एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणार्या मेरठ येथील महिलेला अवस्थ वाटू लागल्याने महिलेने जी.आर.पी. पोलिस कमल शुक्ला यांना सांगितले. त्यावर पोलिसाने विकलांगांच्या डब्यात बसविले. काही वेळानंतर त्या महिलेबरोबर गैरकृत्य केले. हे प्रवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बिजनौर येथील स्टेशनवर संबंधितांना माहिती देऊन पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी ताबडतोड त्या गैरकृत्य करणार्या पोलिसास ताब्यात घेऊन महिलेला उपचारासाठी दाखल केले. महिलेचा जबाब झाल्यावर संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची तेथील पोलिस अधिक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिले.तरी रक्षण करणारेच भक्षक झालेतर समाजावर त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे अशा गैरकृत्य करणार्या पोलिसावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आम्ही आपल्याद्वारे संबंधीता करत आहोत.