Breaking News

बियाणांचे दुकान फोडून कापसाच्या बियाणांची चोरी

बीड, दि. 07 - संपामुळे दुकाने बंद असल्याचा फायदा घेऊन चोरटयांनी बियाणांचे दुकान फोडून कापसाच्या बियाणांच्या पिशव्या पसार केल्या.पेरणासाठी बाजारात  बियाणे आणि खतांची आवक झाली आहे एरवी या काळात बियांणांना एवढी मागणी असते की बियाणांचा तुटवडा पडतो. मात्र, संप असल्यामुळे ही बियाणांनी भरलेली  दुकाने बंद ठेवण्यात आली होती त्याचा फायदा घेऊन काल रात्री चोरटयांनी परळी, नागपूर येथील कृषि मालाचे दुकान फोडून कापसाच्या बियाणांच्या पिशव्या  पळवल्या.