Breaking News

क्रेडिट कार्डची माहिती विचारुन 70 हजार रुपयांची फसवणूक

मुंबई, दि. 07 - मुंबईतील सांताक्रुज येथे राहणा-या एका 73 वर्षीय इसमाला क्रेडिट कार्डची माहिती विचारुन 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.  याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका इसमाने आपण बँक कर्मचारी असल्याचे सांगत संबंधीत व्यक्तीकडून क्रेडिट कार्ड क्रमांक  घेत त्यांच्या खात्यातून 70 हजार रुपये लंपास केले आहेत.
तुमचे क्रेडिट कार्डची मर्यादा संपत आली असून ते लवकरच बंद होणार आहे. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्यासाठी तुमचा क्रेडिट कार्डचा 16 अंकी क्रमांक आणि  सीव्हीव्ही क्रमांक फेरतपासणीसाठी द्यावा लागेल असे आरोपीने सांगितले. त्यांच्या सांगण्यावरुन मी माझे क्रमांक दिले. मात्र, काही तासांमध्येच माझ्या खात्यातून 70  हजार काढण्यात आल्याचे माझ्या लक्षात आले असे पीडित व्यक्तीने सांगितले. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात कलम 420 आणि 419 अंतर्गत प्राथमिक माहिती  अहवाल दाखल करण्यात आला आहे.