Breaking News

शेतकरी संपाचा बारामतीकरांना फटका, मार्केटमध्ये केवळ काही हजारांची उलाढाल

पुणे, दि. 02 - शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबरोबरच विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यासाठी राज्यभरातील ठिकठिकाणच्या शेतकर्‍यांनी दूध, भाजीपाला, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल करणार्‍या भाजी मार्केटमध्ये केवळ काही हजारांची उलाढाल झाल्याचे चित्र आहे.
जोपर्यंत शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत जीवनावश्यक वस्तू बाजारात न आणण्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाचा पहिल्याच दिवशी बारामतीकरांना फटका बसल्याचे दिसते. बारामती येथील उपबाजार समितीत लाखोंची उलाढाल होणार्‍या भाजी मार्केटमध्ये काही हजारोंची उलाढाल झाल्याचे दिसून आले. शेतातील माल काढल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे काही शेतकर्‍यांनी बाजारात विक्रीसाठी माल आणला होता. असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका अडत्याने सांगितले.