संपामुळे होणारे शेतकर्यांचे नुकसान वेदनादायी : धनंजय मुंडे
मुंबई, दि. 02 - राज्यातल्या रस्त्यांवर ओतलं जाणारं दूध, फळं-भाजीपाल्याचा झालेला चिखल व त्यामुळे होणारं शेतकर्यांचं नुकसान हे अत्यंत वेदनादायी चित्रं आहे. राज्यातला शेतकर्याला सन्मानानं जगण्याच्या हक्कासाठी संपावर जाण्याची वेळ यावी, ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं लाजीरवाणी, दुर्दैवी, गंभीर बाब असल्याचं सांगून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपण अत्यंत कष्टी मनानं शेतकर्यांच्या संपाला पाठिंबा देत असल्याचे आज जाहीर केले.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, युती सरकारची कृषी क्षेत्राबद्दलची अनास्था व शेतकरीविरोधी धोरणांमुळे राज्यातला शेतकरी आज संकटात आहे. आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय सरकारने शेतकर्यांसमोर ठेवलेला नाही. कर्जमाफी, शेतमालाला योग्य भावाची हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या शेतकर्यांच्या मूलभूत, न्याय्य मागण्या आहेत. मूलभूत मागण्या व जगण्याच्या हक्कासाठी या राज्यातला शेतकरी पहिल्यांदाच संपावर गेला आहे. शेतकर्यांचा संप असाच सुरु राहिल्यास, शेतकर्यांनी धान्य पिकवलं नाही, दूधाचा पुरवठा केला नाही, तर सगळ्यांवर उपासमारीची वेळ येईल व त्यातून मुख्यमंत्रीही सुटणार नाहीत, असा इशाराही श्री. मुंडे यांनी दिला.
मुख्यमंत्री व सरकार मात्र संपाबद्दल दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. संपात सहभागी झालेल्या व सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्या शेतकर्यांवर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीमार व गुन्हे दाखल केल्याबद्दल श्री. मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त करुन सरकारचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात शेतकर्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत, असा विश्वासही श्री. मुंडे यांनी दिला. शेतकरी जगला तर देश जगेल त्यामुळे जागे व्हा, शेतक-यांच्या संपाची दखल घ्या, त्यांच्या मागण्या मान्य करा अशी मागणी करतानाच जगाचा पोशिंदा शेतकरी संपावर असतांना सरकार शांत कसे राहू शकते ? हा तर सरकारच्या असंवेदनशीलतेचा कळसच असल्याची टीका त्यांनी केली आहे.