शेतकर्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे : जिल्हाधिकारी
बुलडाणा, दि. 05 - शेतकरी सध्या रासायनिक खते व किटकनाशके यांचा वापर करीत आहे. त्यामुळे शेतकर्यांचा साहजिकच शेतमालउत्पादनाचा खर्च वाढतो. मात्र याऊलट सेंद्रीय शेतीमध्ये कुठल्याही प्रकारे बाहेरून रासायनिक खते व किटकनाशकांचा उपयोग होत नाही. परिणामी, सेंद्रीय शेतीला लागणारा खर्च कमी येतो. सेंद्रीय शेतमालाच्या उत्पादनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहु. संस्था सावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या धान्य प्रदर्शनी स्टॉलचे फीत कापून उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्मा यंत्रणेचे उपसंचालक जगताप, श्रीमती नारनवरे, केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. सी. पी जायभाये, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक संचालक स. ई नायकवडी, महिला शेतकरी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमानंतर नियोजन समिती सभागृहात सेंद्रीय शेती या विषयावर कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष व पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेंद्रीय शेतीची कास धरल्यास शेतकर्यांचा उत्पादन खर्च निश्चितच कमी होणार असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, शेतीला जोडधंदा असायला पाहिजे. दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मधुमक्षिका पालन आदींसह शेतीशी निगडीत व्यवसाय करावे. शेळीपालन व एकंदरीतच पशुसंवर्धनाशी निगडीत योजनांचा लाभ घ्यावा. सेंद्रीय शेतमालाच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र जिल्ह्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या धान्य महोत्सवाचा लाभ नागरिकांनी घ्यावा. जेणेकरून सेंद्रीय शेतमालाला बाजारपेठ मिळेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील शेतकरी अजयसिंग राजपूत, धाडचे राजेंद्र बैरागी, इंद्रधनुष्य शेतकरी गटाचे सुरडकर व गवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले. तसेच भारतीय कृषी विकास निगमचे लक्ष्मीकांत देशमुख यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून दिले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दिप प्रज्वजनाला जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील एकमेव महिला शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या सिंदी येथील श्रीमती संगिता खरात यांना बोलावून त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी दिपक सिडाम, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी, शेतकरी, आत्मा व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.