शेतकरी संपाची तीव्रता कायम; आज महाराष्ट्र बंदची हाक!
बुलडाणा, दि. 05 - शेतकर्यांनी विविध मागण्यांकरिता संप पुकारला असून, संपाच्या तिसर्या दिवशीही जिल्हाभरात भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी पूर्ण करेपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा निर्णय जिल्ह्यातील शेतकर्यांनी घेतला. जोपर्यंत शेतकर्यांच्या मागण्या पूर्णत्वास जात नाहीत, तोपर्यंत जिल्ह्यातील शेतकर्यांचा संप सुरूच राहणार असून, यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा खामगावात सर्वपक्षीयांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आला.
स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, या शेतकर्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संप पुकारण्याची दुर्दैवी वेळ कृषिप्रधान असलेल्या देशात शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आली आहे; मात्र शेतकर्यांचे आंदोलन बंद पाडण्यासाठी पुन्हा अर्धवट आश्वासने शासनाकडून शेतकर्यांना दिली जात आहेत; मात्र आता हीच योग्य वेळ असून, शेतकर्यांच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार असून, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आला. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डच्या सभागृहात शनिवारी दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन अहमदाबादकर, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरधर देशमुख, भाराकाँचे माजी आ.दिलीपकुमार सानंदा, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.अनिल अंमलकार, शहरप्रमुख सुनील अग्रवाल, माजी शहरप्रमुख संजय अवताडे, अ.भा.किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पताळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंजाजी टिकार, विदर्भ विकास आवामी पार्टीचे डॉ.नावेद देशमुख यांच्या उपरोक्त सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या 45 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकर्यांवर संपासारखी दुर्दैवी वेळ आली असून, शेतकर्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या 5 जून रोजी खामगाव बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागासोबतच शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवून अधिक तीव्र करण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी दिला.
शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या संपाला समर्थन म्हणून येथील आठवडी बाजार 3 जून रोजी बंद ठेवण्यात आला. कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी 1 जूनपासून शेतकर्यांनी संप पुकारलेला असल्याने त्याला पाठिंबा म्हणून जानेफळ येथे सर्वपक्षीय नेत्यांकडून 3 जून रोजी दर शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एक दिवसाआधीच दवंडी देऊन जानेफळ व परिसरात सूचित करण्यात आले होते. तसेच भाजीपाला अडत व्यापारी इत्यादींना मोबाइलवरून संपर्क करून शनिवारचा बाजार बंद असल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे कुठलाच भाजीपाला अडत दुकान तसेच इतर व्यापारीवर्गसुद्धा दुपारी 12 वाजेपर्यंत बाजारात आपली दुकाने घेऊन आले नाही. त्यामुळे बाजारात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला होता; परंतु दुपारनंतर काही व्यापार्यांनी आपली दुकाने लावल्याने ग्राहकांनी एकच गर्दी केल्यामुळे भाजीपाला व इतर घरगुती आवश्यक वस्तुंची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री झाली. जानेफळ येथे प्रथमच शनिवारचा आठवडी बाजार बंद असल्याचा हा प्रकार घडला आहे. परिसरातील जवळपास 52 खेड्यातील जनता येथील आठवडी बाजारात येत असते; मात्र आजच्या बाजार बंदमुळे जनतेला फारच महागड्या वस्तू खरेदी करणे भाग पडले आहे. शेतकरी नेते गजानन तात्या कृपाळ, पांडुरंग चांगाडे, गणेश पाखरे, रामेश्वर लाहोटी, अशोक नवले, दिनकर पाटील, रमेश मिश्रा आदींनी या आठवडी बाजार बंदचे आवाहन केले होते.