देऊळगाव राजा पोलिसांनी धाड टाकून पकडला 20 हजार रुपयांचा गुटखा!
बुलडाणा, दि. 05 - देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला नव्याने रूजू झालेले ठाणेदार सारंग नवलकरांनी अवैध धंद्यांविरूध्द धडाडीची मोहिम सुरू केली असून त्यांनी 3 जून रोजी येथील दिपक गुप्ता साई किराणा दुकानावर धाड टाकून तब्बल 20 हजार रूपयांचा गुटखा पकडला.
शासनाने गुटखा बंदी केल्यानंतर अवैध गुटखा विकणार्यांनी मोठी शक्तीपणाला लावली असून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात या राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा खरेदी करून महाराष्ट्रात जास्त किमतीने विकण्याचा सपाटा लावला आहे. अवैध गुटखा विक्रीतून लाखो रूपयांची उलाढाल होते. अन्न व औषध प्रशासनाने नुकताच जवळपास 70 लाख रूपयांचा गुटखा नष्ट केला होता. त्यानंतर देऊळगाव राजामध्येही धडाकेबाज कार्यवाही करून ठाणेदार सारंग नवलकर यांनी गुटखा विकणार्यांच्या विरूध्द धडक मोहिम राबविल्यामुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ माजली आहे. तर देऊळगाव राजा येथील दिपक गुप्ता यांच्या साई किराणामध्ये अवैध मार्गाने गुटखा विकल्या जात असल्याची माहिती ठाणेदार नवलकर यांना मिळाल्या वरून त्यांनी तात्काळ कार्यवाही करत गोवा, सितार, आर.एम.डी, सुगंधी सुपारी गुटखा, अंदाजे 20 हजार रूपयांचा गुटखा पकडला व मुद्देमालासह आरोपीस अटक केली. यावेळी ठाणेदार सारंग नवलकर, विजय किटे, केदार बिलगे, नितिन जाधव, उंबरकर आदींनी ही कार्यवाही केली आहे.