Breaking News

रेल्वे कर्मचार्‍यांच्या कामाचे मूल्यांकन करण्याची गरज - प्रभू

नवी दिल्ली, दि. 10 - रेल्वेमध्ये काम करणार्‍यांना कर्मचार्‍यांचे परीक्षण करण्याचा सल्ला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिला आहे. रेल्वेच्या मनुष्यबळ विकास  व्यवस्थापनाच्या एका संमेलनात ते बोलत होते. 
रेल्वे कर्मचार्‍यांच्या कामगिरीच्या आधारावर त्यांना पुरस्कृत करायचे की त्यांना दंडीत करायचे, हे ठरवले गेले पाहिजे. या योजनेची सुरुवात वरिष्ठ स्तरावरून करून  त्यानंतर कनिष्ठ स्तरावर याची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. रेल्वेमार्फत एखादी योजना राबवण्यात येत आहे आणि ते काम नियोजित  वेळेपूर्वी झाले तर त्याचा आढावा घेणार्‍या पथकाला बक्षीस देण्यात आला पाहिजे. याचप्रमाणे कोणी विलंब करत असेल, तर त्याला दंड ठोठावला पाहिजे, असे  उदाहरण त्यांनी दिले. आपल्यातील कमतरता आपण ओळखली तर आपण परिवर्तन करू शकतो, असे ते म्हणाले. सध्या रेल्वेत 13 लाख कर्मचारी असून 17  विभाग आणि 68 मंडळांमध्ये रेल्वे विभागली गेली आहे.