Breaking News

फ्रेंच ओपन : हॅलेपची अंतिम फेरीत धडक

पॅरिस, दि. 10 - फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत तृतीय मानांकित रोमानियाच्या सिमोना हॅलेप हिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने द्वितीय मानांकित  चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलीना प्लिस्कोव्हा हिचा 6-4, 3-6, 6-3 असा पराभव केला. हॅलेप आणि प्लिस्कोव्हा यांच्यातील लढत चुरशीची होणार याची सा-यांनाच  खात्री होती. त्याप्रमाणे सामन्याच्या सुरूवातीपासूनच दोघींनी रंगतदार खेळ केला. पहिला सेट हॅलेपने जिंकला तर दुस-या सेटमध्ये प्लिस्कोव्हा वरचढ ठरली. त्यामुळे  तिसरा सेट उत्कंठावर्धक ठरला. तिस-या सेटमध्ये सुरूवातीपासूनच हॅलेपने आक्रमक पवित्रा घेत आघाडी घेतली. प्लिस्कोव्हाही तोडीस तोड प्रत्युत्तर देत होती. मात्र  तिस-या सेटमध्ये अनुभवाचा पूर्ण वापर करून हॅलेपने सामना आपल्या नावे केला आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली.