गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचा घटस्फोट
मुंबई, दि. 08 - ‘तेरा तेरा तेरा सुरुर, झलक दिखला जा’ यासारख्या बॉलिवूडमधील गाजलेल्या गाण्यांचा संगीतकार, गायक हिमेश रेशमियाने काडीमोड घेतला आहे. मुंबई हायकोर्टाने हिमेश आणि त्याची पत्नी कोमल यांना घटस्फोट मंजूर केला. ‘एकमेकांविषयी नितांत आदर बाळगत, परस्पर संमतीने आम्ही कायदेशीररित्या पती-पत्नी हे नातं संपवण्याचा निर्णय घेत आहोत. मात्र यापुढेही मी कोमलच्या कुटुंबाचा भाग राहीन, तसंच कोमलही रेशमिया परिवाराची सदस्य राहील’, असं हिमेश रेशमियाने सांगितलं. हिमेश आणि कोमल 22 वर्ष एकमेकांसोबत संसार करत होते.
‘आम्ही एकमेकांना अनुरुप नसल्याचं आमच्या लक्षात आलं, मात्र तरीही एकमेकांविषयीचा आमचा आदर तसूभरही कमी झालेला नाही. त्यामुळे आम्ही एकत्रितरित्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढेही आम्ही एकमेकांच्या कुटुंबाचा भाग राहू. यासाठी कोणतीही तिसरी व्यक्ती जबाबदार नाही.’ असं कोमल यांनी स्पष्ट केलं. कोमल आणि हिमेश रेशमिया यांना स्वयम हा मुलगा आहे. लग्नानंतरही कोमल हिमेश राहत असलेल्या बिल्डिंगमध्येच राहणार असल्याचं म्हटलं जातं.