चॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेला नमवल्यास भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म
लंडन, दि. 08 - चॅम्पियन्स ट्रॉफीत विराट कोहलीच्या टीम इंडियाची आज श्रीलंकेसोबत लढत होणार आहे. भारत आणि श्रीलंका संघांमधला हा सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवण्यात येईल. हा सामना जिंकला तर, टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म होऊ शकतं. त्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफित लोळवल्यानंतर भारत विजयी घोडदौड सुरु ठेवतो का, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियानं बर्मिंगहॅमच्या लढाईत पाकिस्तानला लोळवलं. टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर तब्बल 124 धावांनी विजय मिळवला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात भारताचा सामना हा अँजेलो मॅथ्यूजच्या श्रीलंकेशी होत आहे. हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवण्यात येईल.
श्रीलंकेच्या फलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी बजावली होती. पण कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने पोटरीच्या दुखापतीमुळे सलामीच्या सामन्यातून माघार काय घेतली आणि श्रीलंकेच्या फलंदाजीचं सारं समीकरणच बिघडलं. दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिर आणि ख्रिस मॉरिसच्या प्रभावी आक्रमणासमोर श्रीलंकेने अवघ्या 203 धावांत गाशा गुंडाळला. निरोशन डिकेवाला, कुशल मेंडिस, दिनेश चंडिमल, चमारा कपुगेदरा अशा गुणवान फलंदाजांची फळी आजही श्रीलंका संघात मौजूद आहे. पण त्यांच्या गुणवत्तेला एकत्र आणण्यासाठी अँजेलो मॅथ्यूजचं भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणं श्रीलंकेसाठी गरजेचं आहे. त्यात उपुल थरंगावर दोन सामन्यांच्या बंदीची झालेली कारवाई श्रीलंकेची आणखी पंचाईत करणारी ठरली आहे. अँजेलो मॅथ्यूजचं श्रीलंकेच्या फलंदाजीत जे स्थान आहे, तेच त्याच्या आक्रमणात लसिथ मलिंगाचं आहे. मलिंगाचा एखादा भन्नाट स्पेलही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. पण श्रीलंकेच्या दुर्दैवाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांमध्ये असो किंवा सलामीच्या सामन्यांमध्ये श्रीलंकेचं आक्रमण सपशेल अपयशीच ठरलं.