Breaking News

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 29 - जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चव्हाण, तहसीलदार दिनेश गिते आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातही राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.