Breaking News

कंडारी येथील बससेवा पूर्ववत सुरु करा!

बुलडाणा, दि. 29 - नांदुरा तालुक्यातील कंडारी येथे मागील वर्षी गावातील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरु करण्यात आली होती. परंतु शाळेला उन्हाळी सुट्या लागल्यामुळे सदर बस सेवा बंद करण्यात आली होती. 26 जून पासून शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कंडारी येथे बस सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आझाद हिंद संघटनेच्या वतीने विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, बुलडाणा यांना 27 जून रोजी देण्यात आले आहे. 
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कंडारी येथील सुमारे 30 विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी नांदुरा येथे प्रवेश घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून सदर बससेवा त्वरीत सुरु करावी. या विषयाचे गांभिर्य लक्षात घेवून कंडारी, मुरंबा, बफरगाव मार्गे चालणारी बसफेरी पूर्ववत सुरु करण्यात यावी. निवेदनावर सुरेखा निकाळजे, ॠषिकेश अवचार, गौतम हेलोडे, अच्चुत हेलोडे, रोशन हेलोडे, अजाबराव हेलोडे, उज्वला दाभाडे आदींच्या सह्या आहेत.