’सबको शिक्षा, अच्छी शिक्षा’ - प्रकाश जावडेकर
पुणे,दि.26 : सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे सबको शिक्षा, अच्छी शिक्षा देण्यास हे सरकार कटिबध्द आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. सरस्वती मंदीर संस्था आणि स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्यावतीने रात्रशाळेतील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संदीप बुटाला, रविंद्र आबेंकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री जावडेकर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या पुढील शैक्षणिक परिस्थितीची माहिती त्यांनी जाणून घेतली. दरम्यान रात्रशाळेतील तीनशे मुलांना स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्यावतीने शैक्षणिक पुस्तकाचे वाटप जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या देशात विविध परीक्षेत अनेक मुले चांगल्या गुणांनी पास होतात. त्यांचे कौतुकही होते. मात्र दिवसभर काम करुन रात्रशाळेत शिकणार्यांचे तेवढे कौतुक होत नाही. भलेही त्यांना मार्क कमी मिळत असतील, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुले जिद्दीने शिकत असतात. मोदी सरकारने या देशातील प्रत्येकाला शिक्षा मिळावी यासाठी आर्थिक निधीची तरतुदही केली आहे. पण हा देश कौशल्यावर आधारित विकसित व्हावा यासाठी स्किल इंडियाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचा सर्वत्र आग्रह धरला जात आहे. यातून देशाची आर्थिकस्थिती सुधारण्यासा मदत होणार आहे, असेही प्रकाश जावडेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले