पत्नीसह मुलीची हत्या; पतीची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे,दि.26 : लोणावळ्याजवळील ओळकाईवाडीच्या क्रांतीनगर येथील बबन जयवंत धिंदळे (38) या व्यक्तीने स्वतःच्या राहत्या घरात रविवारी पहाटे पत्नी दीपाली (30), मुलगी दीप्ती (11) यांची गळा आवळून हत्या केली. यानंतर धिंदळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बबन यांनी त्याचा मुलगा रोहीत(9) याचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहीत थोडक्यात बचावला. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.