Breaking News

शेतकर्‍यांच्या वीज समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार : खा. प्रतापराव जाधव

बुलडाणा, दि. 01 - कधी दिवसा तर कधी रात्री  मिळणारी वीज, त्यातही   अपुरी व्यवस्था, कमी दाबाची समस्या यामुळे शेतकर्‍यांना मोठया अडचणींचा सामना करावा लागतो. हंगामात सलग 12 तास वीज मिळाल्यास शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतो, त्यामुळे शेतकर्‍यांच्या वीजसमस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन खा.प्रतापराव जाधव यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या रेट्यामुळे सोयगाव येथे 33 के.व्ही. सबस्टेशन मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन नुकतेच खा. जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी धीरज लिंगाडे, संजय गायकवाड, बबनराव तुपे, डॉ.मधुसुदन सावळे, धनशीराम शिंपणे, भोजराज पाटील, दादाराव खार्डे, लखन गाडेकर, अशोक गव्हाणे, रामेश्‍वर पाटील, शरद टेकाळे, श्रीकांत पवार, दिलीप सिनकर, प्रमोद पवार यांची प्रमुख     उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना खा. जाधव म्हणाले की, जालिंदर बुधवत यांच्या रेट्यामुळे सोयगाव परिसरातील शेतकर्‍यांच्या  वीजेच्या प्रश्‍न मार्गी लागणार आहे. विकासाच्या कामांबाबत बुधवत सातत्याने पाठपुरावा करतात त्यामुळे त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. जालिंदर बुधवत यांनी सदर सबस्टेशनला खा. जाधवांमुळेच मंजुरी मिळाल्याचे सांगितले. जिल्ह्यातील 1400 पेक्षाही अधिक गावांतील शेतकर्‍यांशी संपर्क ठेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम खा. जाधव करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी उप तालुकाप्रमुख गजानन टेकाळे, सरपंच उदेभान तायडे, उपसरपंच योगेश पिंपळे, जामठी सरपंच गजानन तायडे, वरुड सरपंच रमेश गोरे, मंगेश तायडे, माजी सरपंच समाधान बुधवत यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.