Breaking News

खामगावमध्ये स्वाभिमानीचे ‘तोंड काळे करो’ आंदोलन!

बुलडाणा, दि. 01 - खामगावमध्ये 30 मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आपले तोंड काळे करून मंदिरात आश्रय घेतला. स्वाभिमानीचे ’तोंड काळे करो’ आंदोलनाने खळबळ माजली आहे.
सरकारच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असंख्य शेतकर्यांसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्वत:चे तोंड काळे करून खामगाव जवळील रेणुका माता मंदिर येथे भीतीपोटी जाऊन बसले. त्यावर आता आम्ही जरी भाजपा सरकारच्या निषेधार्थ तोंड काळे केले असली तरी भविष्यात या राज्यकर्त्यांची तोंड काळे करण्यातआम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी दिला.
बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे त्याला आता खरे तर आधाराची गरज आहे. पण, हे सरकार आश्‍वासन देऊनदेखील आपली      आश्‍वासन पूर्ण करत नाहीत. उतर प्रदेश सरकार कर्जमाफी करू शकते तर महाराष्ट्र सरकार का नाही, हा प्रश्‍न उपस्थित करत आता शेतकर्‍यांवर आपली तोंड लपविण्याची पाळी आली आहे. कर्ज भरण्यासाठी पैसे नाहीत, सरकार कर्जमुक्ती देत नाही त्यासाठी आता चक्क शेतकर्‍यांनी  आपले तोंड काळे करून      घेतले आहेत. इतकेच नव्हे तर या कर्ज वसुलीच्या भीतीपोटी आता लपून बसले आहेत यावर आता कर्जमुक्तीसह स्वामीनाथन आयोग लागु करा, यासाठी खुद्द राजू शेट्टी यांनी आत्मकलेश यात्रा सुरु केली आहे. तर त्यांना हिंमत देण्यासाठी व सरकारच्या भीतीपोटी हे स्वाभिमानीसह शेतकर्‍यांचे अभिनव आंदोलन आहे. बुलडाणा जिल्हा तसा चार वर्षांपासून कोरड्या दुष्काळाची झळा सोसत आहे. शेतीमध्ये उत्पादन होत नाही. त्यामुळे आता शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्या शेतकर्‍यांची कर्ज भरण्याची परिस्थिती नसल्याने हे अभिनव आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनाने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. आता तरी शेतकर्‍यांची कीव या सरकारला येईल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यावेळी गिरधर देशमुख,अमोल राऊत, प्रकाश कोंडे, अनिल मिरगे, राजू नाकाडे, श्रीकृष्ण काकडे, विवेक पाटिल, योगेश इंगळे, सोपान खंडारे, अमित तायडे, दीनकर म्हसने, संदीप चौवन, समाधान भातुरकर, दीपक देशमुख, जगन्नाथ इटनारे, आमिर शहा यांच्यासह बहुसंख्य स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.