Breaking News

वस्तू व सेवा कर लागू झाल्याने सुरुवातीला औषधांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. 28 - वस्तू व सेवा कर लागू झाल्याने सुरुवातीला औषधांचा तुटवडा जाणवण्याची शक्यतायापा-यांकडून व्यक्त केली जात आहे. ही कर प्रणाली  संगणकीकृत असेल त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेतील हा सर्वात मोठा बदल असल्याने परिस्थिती सामान्य  होण्यासाठी सुरुवातीचे काही आठवडे वेळ लागू शकतो, असे सरकारकडूनही सांगण्यात आले आहे.
देशभातील औषध विक्रेतेही सध्या असलेले उत्पादन संपवण्याच्या प्रयत्नात असून त्यामुळे नव्याने मालाची खरेदी कमी प्रमाणात होत आहे. औषध निर्मात्या  कंपन्यांकडून औषधांवर भरघोस सूट दिली जात आहे. पण औषधविक्रेते खरेदी करत नसल्याने जीएसटी लागू झाल्यावर सुरुवातीला औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. जीएसटी लागू झाल्यानंतर औषधांवरील करात कपात होणार असून त्यामुळे आत्ताच खरेदी करुन ठेवल्यास त्याचा तोटा होईल, असे औषधविक्रेत्यांकडून सांगितले  जात आहे.