Breaking News

गोपीचंद बॅडमिंटन अकादमीकडून श्रीकांतला 3 लाखांचे बक्षीस

नवी दिल्ली, दि. 28 - दोन आठवड्यात दोन सुपर सिरिज स्पर्धांचे विजेतेपद पटकावलेल्या किदम्बी श्रीकांत याला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीकडून 3 लाखांचे  बक्षीस देण्यात आले. श्रीकांतने नुकतेच इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सिरिज स्पर्धांचे विजेतेपद पटकावले. या कामगिरीबाबत त्याचे देशभरात कौतुक होत  आहे.
आम्ही चांगली कामगिरी केली आहेर. आमच्या अकादमीतून आंतरराष्ट्रीय किर्तीचे बॅडमिंटनपटू घडत आहेत, याचा अभिमान आहे. अकादमी यापुढेही असे खेळाडू  घडवत राहील, असे सांगून भारताचे माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांनी श्रीकांतची पाठ थोपटली. त्यानंतर श्रीकांतनेही या सन्मानाबद्दल गोपीचंद आणि  अकादमीचे आभार मानले.