राष्ट्रवादीने केला भाजीपाला बाजार बंद!
बुलडाणा, दि. 05 - शेतकरी जगला तर देश जगेल, असे असतांनाही जगाचा खरा पोशिंदा असलेला शेतकरी कर्जाच्या खाईत अडकला असुन अत्यंत हालअपेष्ठांचे जीवन जगत आहे. अनेक शेतकर्यांनी कर्जाच्या चिंतेने आत्महत्येचा मार्ग स्विकारत लेकराबाळांना उन्हात टाकले आहे. शेतकर्यांचे कर्ज माफ व्हावे यासाठी गेल्या अनेक दिवसापासुन शेतकरी संपावर गेलेला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. परंतु सत्तेवर आल्यावर कर्ज माफ करू असे म्हणणार्या सरकारणे शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी न देता वेळकाढु धोरण अवलंबविले आहे. संघटनेमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या कृतिचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी मिळाली, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु कराव्या, दुधाला व शेत मालाला भाव मिळावा याकरीता बुलडाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने विधानसभा क्षेत्रअध्यक्ष नरेश शेळके, जि.प.सदस्य डी.एस.लहाने, यांच्या नेतृत्वात आज 5 जून रोजी रविवारच्या आठवडी बाजारातील भाजीपाला बंदचे आवाहन केले होते. सकाळी पाच वाजेपासुन कार्यकर्त्यांनी शहराच्या चारही बाजुला नाकाबंदी केली होती. शेतकर्यांनी राष्ट्रवादीच्या आव्हानाला प्रतिसाद देत शहरात माल विक्रीसाठी आणलाच नाही. भाजीपाला हर्रासी सुध्दा झाली नाही. दरम्यान, पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा अटोकाट प्रयत्न केला.
सकाळी 10 वाजेपर्यंत भाजीपाला बाजारात एकही दुकान बसलेले नव्हते. आठवडी बाजारात येणारी आवक 25 टक्के पेक्षाही कमी होती. पोलीसांनी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डी.एस.लहाने, जिल्हा उपध्यक्ष नरेश शेळके, सुमित सरदार, संतोष पाटील यांच्यासह अनेक कार्यकत्यार्ंना अटक केली. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर 12 वाजता कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले व लाऊडस्पिकरव्दारे व्यापार्यांना माल विकण्याचे आवाहन केले.भाजीपाला बाजार बंद असल्यामुळे अनेक शहरवासीयांना भाजीपाला मिळाला नाही.
पोलिसांनी डि.एस.लहाने, नरेश शेळके, सुमित सरदार, संतोष पाटील, अनिल वर्मा, गणेश हुडेकर, सुनिल सोनुने, संदिप तायडे, अनिल बावस्कर, शेख सत्तार, रमेश देशमुख, गोविंदा तायडे, दिनकर पांडे, सिध्देश्वर आंभोरे, शिवाजी पडोळ, संजु उंबरहंडे, अनिल कोळसे, ज्ञानेश्वर डुकरे, श्रीराम सुसर, समाधान जाधव, आशिष खरात, शिवाजी गाडेकर, सचिन पाटील, विनोद पैठणे आदी कार्यकर्त्यांना अटक करून स्थानबध्द करण्यात आले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी गणेश हुडेकर, सरोदे मामा, राजु पाटील, सुरेश जाधव, सारंगधर गवळी, रामु चौधरी, बाबु राऊत, अतुल लोखंडे, बबलु कुरेशी, विशाल सोनुने, बबनराव टेकाडे, गजानन टेकाळे, निलेश गाडेकर, राजु प्राणकर, गोपाल माळोदे, गजु गोरे, राजु बावस्कर, मनिष बोरकर, नागेश मुळे, निलेश शिंदे, निबांजी काळवाघे, तुकाराम उबाळे, बळीराम गोरे, गायकवाड, गजानन पवने, किलबले अण्णा, रामेश्वर पवार, ज्ञानेश्वर शेळके, बंडु डुकरे, अनेक राष्ट्रवादी मावळ्यांनी भाजीपाला बाजार बंद आंदोलनाला मदत केली.