Breaking News

कायद्यानुसारच तेज प्रताप यादव यांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय - धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली, दि. 18 - बिहारचे आरोग्यमंत्री तेज प्रताप यादव यांचा पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय कायद्यानुसारच घेण्यात आला आहे. राजकीय  हस्तक्षेपासाठी हा निर्णय घेण्यात आला नाही, अशी प्रतिक्रिया पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली. 
राजकीय हस्तक्षेपासाठी तेज प्रताप यादव यांचा परवाना रद्द करण्यात आल्याची प्रतिक्रिया बिहारचे उपमुख्यमंत्री आणि तेज प्रताप यादव यांचे बंधू तेजस्वी यादव यांनी  तासांपूर्वी व्यक्त केली होती. याच पार्श्‍वभूमीवर प्रधान बोलत होते.
या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप असल्याचे मला वाटत नाही. तेज यादव यांनी अपूर्ण किंवा खोटी कागदपत्रे सादर केली असेल. त्यामुळे त्यांचा पेट्रोल पंपचा  परवाना भारत पेट्रोलियमने रद्द केला असावा, असेही प्रधान म्हणाले.