Breaking News

कर्जदार, जामीनदार, बचाव संघर्ष पार्टीच्या कर्जदार व जामीनदारांच्या समस्या सोडविणार

अहमदनगर, दि. 08 - सध्याच्या परिस्थितीत मुंबईसह महाराष्ट्रात छोटे व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, शासकीय, तसेच निमशासकीय नोकरदार, शेतकरी, मजूर कष्टकरी, तसेच सर्वसामान्य नागरिक, कर्जाला कंटाळून, तसेच वसुलीच्या तगाद्याला त्रासून आत्महत्या होण्याचे प्रकार वाढत असलेले निदर्शनास येत आहे. त्यामध्ये कर्जदार व जामिनदारांवर सावकारी पद्धतीच्या बँका, तसेच सहकारी बँका, वित्तीय कंपन्यांचे अन्याय जास्त सुरू असून, अशा स्थितीत आपल्यासारख्या दक्ष कार्यकर्त्याने समाजामध्ये या सर्व बाबींवर लक्ष देऊन आळा घालण्याची गरज आहे. यासाठी नियुक्ती करण्यात येत आहे, असे कर्जदार, जांमीनदार, बचाव संघर्ष पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब हंंगारगे यांनी केले.
कर्जदार, जांमीनदार, बचाव संघर्ष पार्टीच्या उपकार्याध्यक्षपदी अय्याज बाबा दौलत खान, जिल्हा कार्याध्यक्षपदी फारूक शेख, शहर सरचिटणीसपदी संकेत सोनावणे, शहर उपाध्यक्षपदी विशाल तुपे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश इथापे यांना नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब हंगारगे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निखील शिंगाडे, सिराज दौलतखान, विजय गायकवाड, सुनील खंदारे, भाऊसाहेब ब्राह्मणे, रामलाल टांगळ, अनिकेत सोनवणे, पै. अनिल वाणे, नाना ठाणगे, शांतीलाल साळवे, ज्ञानेश्‍वर पोटे, जग्गू सागर आदी उपस्थित होते.
अय्याज बाबा दौलत म्हणाले की, शहरातील कर्जदारांना वसुलीसाठी नाहक त्रास दिला जातो. गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून वसुली केली जाते. जागोजागी चौकात बसून पॅसेंजरसह गाड्या हिसकावून घेऊन जाण्याचे प्रकारही घडताना दिसून येतात. कर्जदारांना संरक्षण देऊन सर्व जातीधर्मातील लोकांची कामे मार्गी लावली जातील. आपल्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली जाईल. लोकशाहीच्या घटनात्मक चौकटीत राहून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देऊ. दडपशाही व जाचक वसुलीला आळा घालण्यासाठी 12 जून रोजी जिल्हाधिाकरी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार  असून, मोर्चास उपस्थित रहावे, असे आवाहन केले.