सरकारचा गळा योग्य वेळी दाबू - खा . संजय राऊत
मुंबई, दि. 08 - फडणवीस सरकारचा गळा केंव्हा दाबायचा हे आम्हाला चांगले माहित आहे असे वक्तव्य करत सेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरे हे परदेश दौर्यावरून या बाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असेही खा . राऊत यांनी स्पष्ट केले.
खा. राऊत यांनी भाषबरोबर युती करून राज्य सरकारमध्ये सामील होण्यास सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै . सामनाचे संपादक असलेल्या खा . राऊत यांनी या पूर्वी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. गेल्या वर्षी औरंगाबाद येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना खा . राऊत यांनी भाजप सरकारचा कारभार निजामापेक्षाही वाईट असल्याची टीका केली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शी जागावाटप करण्यास खा . राऊत यांनी विरोध दर्शविला होता.
पत्रकारांशी बोलताना खा. राऊत म्हणाले की , फडणवीस सरकार शेतकर्यांच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी कचरत असल्याचे दिसून येत आहे . अशा स्थितीत या सरकारमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही . या सरकारचा गळा केंव्हा दाबायचा हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे परदेश दौर्यावरून भारतात परतल्यानंतर योग्य निर्णय जाहीर करतील.