Breaking News

तेलंगणाचे काँग्रेस खासदार पल्लवी गोवर्धन रेड्डी यांचे निधन

कुल्लू, 9 जून, दि. 10 -  तेलंगणाचे काँग्रेस खासदार पल्लवी गोवर्धन रेड्डी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. रेड्डी हे शुक्रवारी सकाळी  हवाई मार्गाने कुल्लू येथे पोहोचले. रेड्डी यांना विमानातच हृदय विकाराचा झटका आला होता. त्यांचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र रुग्णालयात  नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे जिल्हाधिकारी यूनस खान यांनी हिंदुस्थान समाचारशी बोलताना सांगितले.
रेड्डी यांचे पार्थिव पुन्हा तेलंगाणा येथे नेण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि नात सुद्दा सोबत होती. त्यांना ही पुन्हा  पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. रेड्डी हे खासदारांच्या पथकासह शुक्रवारी सकाळी दिल्लीहून भुंतर येथे पोहोचले होते. खासदारांचे हे पथकअभ्यास दौ-यासाठी  आले होते. रेड्डी यांनी पाच वेळा आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य पद सांभाळले होते.