पाकिस्तानी दहशतवादी गुजरातमार्गे घुसखोरी करण्याच्या तयारीत; गुप्तचर विभागाची माहिती
नवी दिल्ली, दि. 10 - जम्मू-काश्मीरमार्गे घुसखोरी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरत असल्याने आता पाकिस्तानी दहशतवादी गुजरातमार्गे घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे गुप्तचर विभागाने सांगितले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी तटरक्षक दल व कुशल जलतरणपटूंना घुसखोरीचे नवे मार्ग शोधण्याचे काम सोपवले आहे. अहमदाबाद, सूरत व मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांना पुन्हा लक्ष्य करण्याची पाकिस्तानची योजना आहे. सर खाडीजवळील आपल्या चौक्या मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानच्या तटरक्षक दलाची क्षमता वाढवण्यासाठी लोकावो चौकी सर खाडीजवळ नेण्याचीही योजना तयार केली जात आहे. याशिवाय जी पिलर लाईनजवळ आणखी दोन चौक्या उभारल्या जात आहे. दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करण्याबरोबरच भारताच्या गस्ती पथकाला लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा उद्देश आहे.
गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर सीमा सुरक्षा दलाने सुरक्षेत वाढ केली असून सक्षम हॉवरक्राफ्टही तैनात केले आहेत. अमेरिकेत तयार करण्यात आलेले हे हॉवरक्राफ्ट 10 किलोमीटरच्या अंतरावर शत्रूच्या नौकेला लक्ष्य करू शकते. सीमा सुरक्षा दलाने खाडी भागातील जवानांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.