Breaking News

आई-मुलीवर बलात्कार करणारा दिल्लीतील आरोपी अटकेत

गुरुग्राम, दि. 10 -  विधवा महिला आणि तिच्या 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचे नाव आशीष असे आहे.  महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनंतर याप्रकरणाचा तपास करण्यास पोलिसांनी सुरूवात केली.  तपासादरम्यान या आरोपीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
उत्तराखंड येथील रहिवाशी 36 वर्षीय महिलेची आरोपी तरुणाबरोबर काही दिवसांपूर्वी मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांच्यात शारिरीक संबंध निर्माण झाले होते. यामुळे  तिच्या मुलीबरोबरही आरोपीची ओळख झाली होती. मात्र मी घरात नसताना त्याने माझ्यावर मुलीवर बालत्कार केला असल्याचा आरोप महिलेने या युवकावर केला  आहे. याबाबत माहिती मिळताच महिलेने मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी महिलेची आणि तिच्या मुलीची तपासणी केली असता त्यांच्यावर बलात्कार  केला असल्याचा स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानुसार त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर  केले जाणार आहे.