काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पूर्ण सूट मिळावी - मुलायम सिंग यादव
लखनौ, दि. 27 - काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पूर्णपणे सूट मिळणे आवश्यक असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी, तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी व फुटीरतावाद्यांच्या फटकारण्यासाठी लष्कराला पूर्ण सूट मिळणे आवश्यक आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत बोलण्यासाठी त्यांनी नकार दिला. सध्या त्याबाबत विचार करत नसल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवनेही या कार्यक्रमास हजेरी लावली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मात्र या कार्यक्रमास गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. राज्यपाल राम नाईक व उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी या कार्यक्रमास हजेरी लाउन सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.