Breaking News

लॉकरमधील वस्तू हरवल्यास बँक जबाबदार राहणार नाही; रिझर्व्ह बँकेकडून इशारा



मुंबई ,दि.26 : बँकेतील लॉकरमधून मौल्यवान वस्तू हरवल्यास अथवा चोरी झाल्यास त्यासाठी कोणतीही बँक जबाबदार राहणार नाही असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे. माहितीअधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने हे स्पष्टीकरण दिले आहे. लॉकरमधील वस्तू हरवल्यास ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याबाबतचे कोणतेही नियम अस्तित्वात नाही असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक आणि 19 राष्ट्रीय बँकांकडून वकिल कुश कार्ला यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. त्यावर रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिले.
तर, ग्राहकांच्या वस्तू चोरी झाल्या तर ती जबाबदारी बँकेची नसून ग्राहकांची असेल असे उत्तर बँकाकडूनही देण्यात आले आहे. बँकांचे उत्तर ऐकल्यानंतर वकील कार्ला यांनी भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाकडे (सीसीआय) तक्रार दाखल केली आहे. तसेच जर बँकेत मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याची काही हमी मिळत नसेल तर त्या वस्तू घरात ठेवणे सोयीचे ठरेल असा प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थित केला.