Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटी लागू करण्यासाठी जेटलींचे मुख्यमंत्री मुफ्ती यांना पत्र

नवी दिल्ली, दि. 27 - संपूर्ण देशभराप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्येही 1 जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू करण्यात यावा, यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांना पत्र पाठवले आहे.
1 जुलैपासन देशभरात जम्मू-काश्मीर वगळता सर्व राज्यांत वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्येही ही कर प्रणाली लागू व्हावी, अशी जेटली यांची इच्छा आहे. जेणेकरून एक देश-एक कर प्रणालीचे केंद्र सरकारचे लक्ष्य पूर्ण होऊ शकेल. यासाठी जेटली यांनी मुख्यमंत्री मुफ्ती यांना हे पत्र पाठवले आहे. देशभरात लागू होणारे कायदे जम्मू-काश्मीरमध्ये लागू होत नाही, अशी आतापर्यंतची परंपरा आहे. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून स्वातंत्र्योवर काळातील अनेक परंपरा मोडीत काढल्या आहेत. त्याचाच एक भाग देशातही एकच कर प्रणाली लागू व्हावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.