मनपाच्या वतीने ध्वनीमापक यंत्रे पोलिस प्राधिकरणास प्रदान
यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, सभागृह नेते अनिल शिंदे, उपायुक्त अजय चारठणकर, माजी महापौर भगवानफुलसौदर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, पोलिस निरिक्षक प्रसाद गोकुळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, श्रीनीवास बोज्जा, संपत नलावडे, भांगरे, सचिन शिंदे, आरोग्य अधिकारी बोरगे आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याबेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, सन 2015 पासून याचिकेच्या निर्णयावर अंमलबजावणी कणे आवश्यक होते. सदर ध्वनी प्रदुषण, ध्वनीमापक यंत्रे, साउंड लेव्हल मिटर, टाईप 2 मशनि, मनपाच्या वतीने पोलिस प्रशासनास उपलबध करुन दिले आहे. या मशिनव्दारे शाळा, कॉलेज, हॉस्पीटल, सरकारी कार्यालये, व महत्त्वाच्या रस्त्यावर होणारी वाहतूक व गाड्यांचे आवाज तसेच हॉर्नचे आवाज यांचे मोजमाप प्रत्यक्ष होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सुध्दा ध्वनी प्रदूषणा बाबत काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. यातुन ध्वनीप्रदुषण टाळता येणार असुन याचे मोजमाप करण्यात येणार आहे.