महाराष्ट्र बंद मध्ये मिरजगाव व्यापारीही सहभागी स्वतःहून दुकाने बंद ठेवली तर शेतकरी दोन तास रस्त्यावर
अहमदनगर, दि. 06 - मिरजगांव सह पंचकृशीतील शेतकर्यांचा दोन तास रस्ता रोको शेतकर्यानी रस्त्यावर दुध व कांदे ओतुन सरकारचा तिव्र शब्दात निषध केला आहे. 5 मे रोजी महाराष्ट्र बंदला शेतकरी संघटनांनी दिलेल्या हाकेला मिरजगांव सह परीसरातील शेतकर्यांनी एकत्र येवुन मिरजगांव येथुन जाणर्या नगर सोलापुर रस्ता आडवुन जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या व या सरकारचा निषेध केला यामध्ये मिरजगांव, बाभुगांव , रातंजन, तिखि, कोेकणगांव, निमगांव गांगर्डा येथुन शेतकरी उपस्थित होते. यावेळी मिरजगांवचे शिवसेना नेते व उपसरपंच अमृत लिंगडे, राजेद्र गोरे, संजय पवार, जिल्हा परीषद सदस्य गुलाबराव तनपुरे, डॉ. श्रीराम धस, डॉ. पंढरीनाथ गोरे, उध्दव म्हस्के, कर्जत पंचायत समितीचे उपसभपती प्रशांत बुध्दीवंत, लहु वतारे, शेतकरी संघटनेचे विक्रम शेळके सह शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी शासनाचा निशेद करत म्हणाले शेतकर्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली पाहीजे. शेतकर्यांचे सात बारा कोरा झाला पाहीजे शेेतकर्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहीजे दुधाला भाव मिळाला पाहीजे तर यावेळी शिवसेना नेते अमृत लिंगडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव तनपुरे, राजेद्र गोरे, सुनिल बावडकर, शेतकरी संघटनेचे विक्रम शेळके संजय पवार यांची भाषणे झाली.
यावेळी या सर्वांनी शासनाचा तिव्र शब्दात निशेद नोंदवला व मागण्या मान्य न झाल्यास अंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा शेतकर्यांतर्फे देण्यात आला.
यावेळी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मिरजगांव ग्रामस्थांनी व येथिल व्यापरी संघटनांनी उत्सपुर्त पांठीबा देत दिवस भर सगळे व्यावहार बंद ठेवत दुकाने बंद ठेवुन बंदमध्ये सहभागी झाले.
अनेकदा गजबजलेल्या ठिकाणी आज कोणीही दिसत नव्हते. शेतकर्यांना पाठिंबा म्हणून अनेकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. शहरातील विविध ठिकाणी आज बंदला मोठा पाठींबा मिळाला आहे. शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य दिसत होते. तर अनेक ठिकाणी चौका चौकात युवका गर्दी करुन उभे होते.
जिल्हात आज बंदला अनेकांनी पाठींबा दिला असून शहरातील कामे सर्व ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. आजच्या बंदमध्ये शिवसेनेनेही बंदमध्ये आपला सहभाग नोंदविला होता.