अॅक्सिडेंटल पीएम, मनमोहन सिंहांच्या भूमिकेत अनुपम खेर!
मुंबई, दि. 06 -माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मनमोहन सिंह यांची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहिला असेलच. तसंच यांच्या भूमिकेत कोण-कोण चपखल बसेल याचेही अंदाज सुरु झाले असतील. पण मनमोहन सिंहांवर सातत्याने टीका करणारे आणि मोदी सरकारच्या बाजूने उभे राहणारे, अभिनेते अनुपम खेर हे मनमोहन सिंहांची भूमिका साकारणार आहेत असं जर सांगितलं, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे मोठ्या पडद्यावर मनमोहन सिंह साकारणार आहेत. पंतप्रधानपदाच्या काळात मनमोहन सिंह यांचे मीडिया सल्लागार राहिलेले, संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असेल. संजय बारु यांचं ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर- ‘द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह’ हे पुस्तक 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी प्रकाशित झालं. त्यावेळी या पुस्तकावरुन मोठा गदारोळ झाला होता.
अनुपम खेर यांचा हा आगामी चित्रपट 2018 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. म्हणजेच लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाचा पहिला लूक बुधवारी प्रदर्शित होणार आहे. अनुपम खेर मनमोहन सिंह यांची भूमिका साकारणार असल्यानं या चित्रपटाची उत्सुकता वाढलीय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. हा सिनेमा विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित करणार असून, हा त्यांचा पहिलाच सिनेमा असेल. सध्या तरी अनुपम खेर यांचंच नाव निश्चित झालं आहे. अन्य भूमिकांसाठीची नावं अजून निश्चित झालेली नाही.