Breaking News

वेदश्री पवारचे सातत्यपूर्ण यश ग्रामीण विद्यार्य्थांसाठी प्रेरणादायी - सौ.नागवडे

अहमदनगर, दि. 01 - कु.वेदश्री पवार हिने बारावीच्या परिक्षेत शेकडा 96 % गुण मिळवून तालुक्यात नवा इतिहास रचला आहे.दहावीनंतर बारावीच्या परिक्षेत लक्षवेधी यश मिळवून सातत्य कायम राखले आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे हेच वेदश्रीने सिध्द केले आहे. तिचे यश ग्रामीण भागातील विद्यार्य्थांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ.अनुराधा नागवडे यांनी काढले.
बारावीच्या परिक्षेत येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील  विद्यार्थीनी कु.वेदश्री पवार हीने शेकडा 96 % गुण मिळवले. तीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावताना मोठे यश मिळवले.तिचा व पालकांचा सत्कार जि.प.च्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ.नागवडे यांनी विशेष सत्कार केला.यावेळी बोलताना सौ.नागवडे म्हणाल्या की, दोन   वर्षांपूवी शालांत परिक्षेत शेकडा 96 % गुण मिळवणार्‍या वेदश्रीने अभ्यासातील एकाग्रता व सातत्याच्या जोरावर बारावीच्या परिक्षेतही शेकडा 96 % गुण मिळवले.ही बाब कौतुकास्पद आहे.तिच्या यशात तिचे पालक व गुरुजनांचा निश्‍चित वाटा आहे. पण तिची जिद्द,चिकाटी व अभ्यासातील सातत्य या बाबी तिला सातत्यपूर्ण यश मिळवून देण्यास कारणीभूत आहेत.तिचे यश ग्रामीण भागातील अन्य विद्यार्थ्यांचा हुरुप वाढविणारे व प्रेरणादायी आहे.
सत्काराला उत्तर देताना कु.वेदश्री पवार हीने पालकांचे व गुरुजनांचे योगदान या यशात महत्वपूर्ण ठरले असल्याचे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्य्थांनी न्यूनगंड बाजूला ठेवून प्रयत्न केल्यास निश्‍चित मिळते असे सांगितले. मला मिळालेले यश हे माझ्यासह पालक व महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असल्याचेही तिने सांगितले. कु.वेदश्रीचे वडील प्रा.नंदकुमार पवार यांनी सांगितले की,कु.वेदश्रीने मन लावून केलेला अभ्यास तिला यश मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरला.दहावी व बारावीच्या परिक्षेत तिने स्वतःच्या यशाची कमान कायम ठेवली.