Breaking News

वारसा चालवताना संघर्ष करणार सामान्य माणसापासून दूर जाणार नाही

। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आनावरण

अहमदनगर, दि. 01 - राज्यात अनेक मोठे नेते झाले पण लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या एवढे जनतेचे प्रेम कुणाला मिळाले नाही. ते आसाताना त्यांचा मोठा दरारा होता. त्यांच्या नंतर ही त्यांच्या नावाला विरोधक आजही घाबरतात.त्यांचा वारसा चालवताना कितीही संघर्ष करावा लागला तरी सामान्य माणसा पासून  दूर जाणार नाही असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी केले.
 तालुक्यातील नांदूर निंबादैत्य येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण ना. मुंडे यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन आ. शिवाजी कर्डीले भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड , नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर , उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्या सुनिता दौंड, जेष्ठ नेते अशोक गर्जे , सुवेंद्र गांधी, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, बीडचे जेष्ठ भाजपा नेते विजय गोल्हार, जेष्ठ नेते अर्जुन शिरसाठ, आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. नियोजीत वेळेपेक्षा तब्बल साडेतीन तास उशीर होउन ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मुंडे समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामदैवत निबंदैत्यापुढे महापुजा , पुतळ्याचे अनावरण व किसान मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन ना. मुंडे यांच्या हस्ते झाले .भगवान गडाच्या पायथ्याला नांदुर गाव असून गडावर दर्शनासाठी मुंढे जाणार की नाही याकडे कार्यकर्त्याचे लक्ष लागले होते.मूळ कार्यक्रमाला झालेला उशीर व गडाच्या महंता बरोबर दुरावलेले संबध यामुळे मुंढे यांनी गडावर जाण्याचे तर  टाळलेच पण भाष्य करण्याचे सुध्दा टाळले.मुंढे म्हणाले,तीन वर्षापूर्वी गोपीनाथ मुंढे केंद्रीय मंत्री झाल्यावर भगवान गडावर दर्शनासाठी आले व त्यानंतर चौंडीच्या कार्यक्रमाला गेले.त्यामुळे 31 में हा दिवस कधी विसरु शकत नाही.अनेक जन्माची पुण्याई म्हणून मुंढेंच्या पोटी जन्म मिळाला .समाजसेवेचा वारसा आपण कुणालाही घाबराता खंबीरपणे चालवू.जनतेची साथ व भगवानबाबांचे आशीर्वाद आपल्यासाठी मोलाचे आहेत.येत्या तीन तारखेला गोपीनाथ गडावर केंद्रीय मंत्री ,मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यतिथि निमित्ता ने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जनतेकडून मिळणारे पाठबळ कधीही वाया जाऊ देणार नाही.लोकनेत्यां एवढे कुणी मोठे होऊ शकणार नाही पण संघर्ष व सर्वसामन्यांशी असलेली नाळ कधी तूटू देणार नाही.गोपीनाथ मुंढेंमुळे आपली ओळख आहे सत्ता अथवा पद महत्वाची नाहीत.देव,साधू ,संतांचे, समर्थाकांचे आशीर्वाद घेतले . आता चांगल्या कामासाठी निंबादैत्या चे (राक्षस) आशीर्वाद सुध्दा घेतले.