Breaking News

नालीसह सिमेंट रस्ता पूर्ण करुन द्या!

देऊळगाव राजा येथील वार्ड क्र.1 च्या नागरिकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

बुलडाणा, दि. 21 - शहरातील नगरपालिका हद्दीतील अमृतनगर, धुंडीराज नगर येथील नागरिकांनी लोकसहभागातून महम्मद इसाक यांच्याघरापासून ते नामदेव  जाधव यांच्या घरासमोरुन ज्योतीबाई डोणगावकर यांचे अकृषक प्लॉट क्र.18 पर्यंत   नालीचे खोदकाम लोक सहभागातून पूर्ण केले आहे. सदर काम नगरसेविका  रंजनाताई बाळू शिंगणे व विद्या अतिश कासारे यांचया सहकार्याने पूर्ण केले. मागील अनेक वर्षांपासून या भागात नाल्या व सिमेंट रस्ता नसल्याने अनेक ठिकाणी पाणी  साचते व रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यातून रोगराईचे प्रमाण वाढत असल्यामुळे अमृतनगर व धुंडीराजनगरमधील नागरिकांनी लोकसहभागातून  नालीचे खोदकाम केले आहे. त्यामुळे परिसरामध्ये पक्क्या नालीचे बांधकाम व सिमेंट रस्ता तात्काळ करुन द्यावा, अशी मागणी 20 जून रोजी मुख्यकार्यकारी  अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर बाबासाहेब कासारे, संतोष डोंगरे, सुभाष बोरुडे, बळीराम गवई, लंकेश्‍वर डोंगरे, पुष्पा  सोनसाळे, मीना देशमुख, पुष्पा गाडेकर यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.