कृषी सहायकांचे आंदोलन!
बुलडाणा, दि. 21 - कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यानुसार टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्यात येत असून, 12 ते 14 जून दरम्यान काळया फिती लावून कामकाज व त्यानंतर 15 ते 17 जून दरम्यान लेखणी बंद आंदोलनानंतर 19 जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.
कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधाबाबत अधिकारी व कर्मचार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच पदे वर्ग करण्याला कृषी सहायकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यानुसार संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी सात टप्प्यात आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्याततहसीलदार चिखली व तालुका कृषी अधिकार्यांना निवेदन देण्यात येऊन काळी फित लावून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनातील तिसर्या टप्प्यानुसार 19 जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतिष काकडे, कार्याध्यक्ष दीपक बोरे, सचिव आर.एम.गवई, कोषाध्यक्ष काकासाहेब दळवी यांच्या नेतृत्वात जिल्हयातील कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले.