मुख्याध्यापकाच्या हलगर्जीपणामुळे डीएडच्या विद्यार्थिनीचे वर्ष गेले वाया!
बुलडाणा, दि. 21 - तालुक्यातील निवाणा येथील विलासराव देशमुख अध्यापक महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व सचिवांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, यासाठी दि.20 जून रोजी कु.मयुरी चंद्रशेखर घिवे या डी.एड.च्या विद्यार्थिनीने गटविकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.
सदर तक्रारीत कु.मयुरी हिने सन 2016 मध्ये डिएडच्या अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतला. नियमित अभ्यासक्रम पूर्ण केला व तीन हजार चाळीस रुपये परिक्षा शुल्क मुख्याध्यापक व सचिव यांनी माझेकडून वसूल केले. परंतु सदर शुल्क ही विद्यापीठात भरली नसल्याने माझे शैक्षिणिक वर्ष वाया गेले असल्याचे नमूद करुन 30 मे रोजी प्रवेशपत्र घेण्यासाठी गेले असता मुख्याध्यापक व सचिव यांनी प्रवेशपत्र नाकारले. व तुला परिक्षेला बसता येणार नाही म्हणून सांगितले आणि परीक्षा शुल्क परत घेवून जाण्यास सांगितले. मला उद्धट भाषेत बोलून तुच्छतेची वागणूक दिली. व तुझ्याकडून काय होते ते करुन घे, असे म्हणत धमकी दिली. म्हणून सदर घटनेची योग्य चौकशी करुन माझे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून मला न्याय द्यावा व विलासराव देशमुख अध्यापक महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व सचिवांवर कायदेशीर कडक कार्यवाही करावी, अशीही मागणी कु.मयुरी घिवे हिने गटविकास अधिकार्याकडे दिलेल्यानिवेदनाद्वारे केली आहे.