Breaking News

‘आयसीसी’च्या नव्या घटनेचे आणि आर्थिक धोरणांचे ‘सीएसए’कडून स्वागत

जोहान्सबगर्र्, दि. 29 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्वीकारलेली नवीन घटना आणि इतर आर्थिक बाबींमधील बदलाचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने (सीएसए)  स्वागत केले आहे. यंदाच्या परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवी घटना सर्व सदस्यांनी एकमताने मान्य केली.
परिषदेने स्वीकारलेल्या नव्या घटनेचे आणि आर्थिक आराखड्याचे आम्ही स्वागत करतो. या बदलांचा परिषदेसह सर्व सदस्य देशांना नक्कीच फायदा होईल आणि  क्रिकेट हा खेळ जगभरात अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल, असा विश्‍वास मंडळाचे अध्यक्ष ख्रिस नेन्झानी यांनी व्यक्त केला. तसेच, हे सर्व बदल आणि आराखडे  परिषदेच्या सभेत एकमताने मान्य करण्यात आले, याचा जास्त आनंद आहे. यामुळे सदस्य देशांची एकी दिसून येते, असेही ते म्हणाले.