Breaking News

अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूंना चेन्नईत मिळणार क्रिकेट प्रशिक्षण

नवी दिल्ली, दि. 29 - अफगाणिस्तानचा युवा (19 वर्षाखालील) क्रिकेट संघ विश्‍वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेण्यास चेन्नईला येणांर आहे. युवा विश्‍वचषक  स्पर्धा पुढील महिन्यात सिंगापूर येथे खेळण्यात येणार आहे. त्यासाठी अफगाणिस्तानचा संघ भारतात प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहे. आधी हा संघ नॉयडा येथे  प्रशिक्षण घेणार होता, मात्र काही कारणास्तव आता हे प्रशिक्षण चेन्नईत दिले जाणार आहे. अफगाणिस्तानचा सिनियर क्रिकेट संघ सध्या नॉयडा येथे प्रशिक्षण घेत  आहे.