दिल्लीतील आप कार्यालयाबाहेर कुमार विश्वास यांच्या विरोधात फलक
नवी दिल्ली, दि. 18 - दिल्लीतील आयटीओ मार्गावरील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर आप नेते कुमार विश्वास यांच्या विरोधातील फलक लावण्यात आले आहेत. कुमार विश्वास विश्वासघातकी आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे एजंट असून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे, असे फलकात म्हटले आहे. कुमार विश्वास भाजपाचे मित्र आहेत, कवि नाही विश्वासघातकी आहेत. अशांना पक्षातून काढा, असे या फलकावर लिहिण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे नेते दिलीप पांडे यांनी बुधवारी कुमार विश्वास यांच्याविरोधात ट्विट केले होते. वसुंधरा राजे यांच्या सरकारवर कुमार विश्वास टीका का करत नाही, असा सवाल पांडे यांनी या ट्विटमध्ये केला आहे. मात्र याबाबत कुमार विश्वास यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेलेली नाही.
