स्पर्धा जिंकण्यासाठी इंग्लंडकडे आक्रमता हवी : बेलीस
बर्मिंगहम, दि. 01 - चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जर इंग्लंडला जिंकायची असेल, तर त्यांना आक्रमक खेळ करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलीस यांनी व्यक्त केले आहे. आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या पाच षटकात 6 गडी गमावले होते.त्या पार्श्वभूमीवर बेलीस बोलत होते.
स्पर्धा जिंकण्यासाठी कर्णधाराची वृत्तीदेखील थोडीशी आक्रमक असणे गरजेचे आहे. संघ म्हणून इंग्लंडने चांगली कामगिरी केली आणि फलंदाजी,गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात संघ समतोल राहू शकला, तर इंग्लंडला स्पर्धा विजयाची पूर्ण संधी आहे. गेल्या दोन वर्षात संघाची कामगिरी चांगली झाली आहे, त्यामागेदेखील सांघिक प्रयत्न हेच कारण आहे, असे बेलीस म्हणाले.
आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात असमाधानकारक कामगिरी केल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील सराव सामन्यामध्ये उत्तम फलंदाजी केली आणि 300हून अधिकची धावसंख्या उभारली. यातून खेळाडूंची लढाऊ वृत्ती दिसून येते आणि त्याचे विशेष कौतुक वाटते, असेही बेलीस यांनी सांगितले.