Breaking News

शेवटच्या षटकांत खेळण्याबाबत धोनीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले : हार्दिक पांड्या

लंडन, दि. 01 - फलंदाजी करताना शेवटच्या षटकांमध्ये कसे खेळावे, याबाबत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मला केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरले, असे मत  अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने व्यक्त केले. काल बांगलादेशविरूद्ध झालेल्या सराव सामन्यत हार्दिकने 54 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली. त्याबाबत तो  बोलत होता.
धोनीला मी एके दिवशी विचारले की शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करताना काय करणे आवश्यक असते. त्यावेळी तो मला म्हणाला होता की, अशा वेळी आपण  एक डोळा कायम धावफलकाकडे ठेवावा. तर दुस-या डोळ्याने खेळपट्टीचा अंदाज घ्यावा. खेळताना संघासाठी खेळावे, म्हणजे वैयक्तिक कामगिरी आपोआपच चांगली  होते. महत्वाचे म्हणजे आपल्या संघाला जिंकवायचे असते, त्यामुळे स्वत: कधीही दडपण घ्यायचे नाही.त्याच्या या मार्गदर्शनामुळे मी योग्य फटके मारू शकलो आणि  चांगली कामगिरी करू शकलो, असे हार्दिक म्हणाला. या सामन्यात बांगलादेशला भारताने 240 धावांनी पराभूत केले.